Thursday, January 28, 2021

निवडणूकीत दारू पाजणारी संस्कृती नष्ट करा – हेरंब कुलकर्णी

अकोले (प्रतिनिधी)
लग्नातील वरातीत आणि राजकीय वर्तुळातून होणार्‍या निडणुकांतून तरुणांना आयुष्यात दारू पाजण्याची सुरुवात करण्यात येणारी प्रशिक्षण केंद्र बनली. सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकाचे वारे वहात आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांकडून व गावातील नागरिकांमधून यावर लक्ष देऊन आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका जे उमेदवार व त्यांचे समर्थक दारूमुक्त करण्यास प्राधान्य देतील, त्यांना निवडून आणण्यात प्रयत्न करावेत. उमेदवारांनीही आपल्या प्रभागातून ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त वातावरणात पार पाडणार असे आवाहन करावे. मतदारांनीही अशाच उेमेदवारांना मतदान करावे. याबाबत गावातील जाणत्या माणसांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दारूबंदी आंदोलनाचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले.

या निवडणुका आठवड्यात संपून जातील. पण तरुणांना लागणारे व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील. हे व्यसनी तरुण तुमच्या, माझ्या घरातीलच असणार आहेत. आज फुकट दारू पिणार्‍या तरुणांना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे, याचे भान ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्हीही पॅनलने व गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणार्‍या व मुलांना हॉटेलमध्ये नेणार्‍या उमेदवारांना जाणीव करून समज द्यावी. तसेच गावातील मतदारांनी दारू पाजून मते मिळवण्याचा मार्ग शोधणार्‍या उमेदवारांस पराभूत करावे, असेही आवाहन केले. तसेच अशा उद्दाम उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे कराव्यात. राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडून दारू वाहतूक, वेळ संपल्यावर रात्री हॉटेल्स उघडी राहणे व अवैध दारूची विक्री करणे, याबाबत लक्ष ठेवावे व संबंधितांवर कडक कारवाई करावी. याबाबत शासकीय यंत्रणेला दारूबंदी आंदोलक पत्र देणार आहेत. तेव्हा प्रशासनाकडून व नागरिकांकडून सर्व स्तरावरून या निवडणुका दारूमुक्त व्हाव्यात यासाठीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन दारूबंदी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रसिद्धी पत्रकावर अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड. रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुर्तडक, अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुंजकर, संदीप दराडे, मारुती शेळके, जालिंदर बोडके यांचाही नामोल्लेख आहे. ज्येष्ठांसह महिलांचा यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची माहिती कुलकर्णी यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...