Tuesday, June 8, 2021

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)
तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज उठविल्याने काही गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्याला धमकी देतात. याचीही दखल पोलीस घेत नसल्याने थेट आपले सरकार पोर्टलवर पोलीसांविरुध्द गंंभीर आरोप करत पोलीसांची बदनामी करणारा मजकूर टाकला. या प्रकरणी तालुका पोलीसांनी प्रशांत विलास कचेरे (रा. धांदरफळ खुर्द) याच्याविरुध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेंद्र रामनाथ सहाणे यांनी फिर्याद दाखल केली. यात त्यांनी म्हटले आहे की, मी महेंद्र सहाणे धांदरफळ बीटचा तपासी अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत आहे. सोबत सहाय्यक फौजदार बी. बी. घोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एम.एन. जाधव हे बीट अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान आरोपी प्रशांत विलास कचेरे याने 21 एप्रील रोजी आपले सरकार पोर्टलवर पोलीसांवर भ्रष्टाचार व दारुचे हफ्ते घेत असल्याबद्दल खोटी व बदनामीकारक तक्रार टाकली. धांदरफळ खुर्द परिसरात चालणार्‍या अवैध दारुविक्रीची माहिती आपण पोलीसांना देतो त्यामुळे अवैध व्यवसाय करणारे गुंड मला धमकी देतात. पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यावर माझा विश्‍वास राहिला नाही. ते आर्थिक देवाण घेवाणीमुळे या अवैध धंद्याला पाठीशी घालतात. असे बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप आपले सरकार पोर्टलवर व सोशल मिडीयावर टाकून पोलीसांची जनमानसातील प्रतिमा मलिन केली.

दरम्यान आरोपी प्रशांत कचेरे व त्याचे कुटूंबिय हे पुर्वीपासुन दारुविक्री व्यावसायीक असून सद्यस्थितीत त्यांच्यावर पुर्णपणे निर्बंध आहेत. बेकायदा दारुविक्री प्रकरणी त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच कचेरे यांनी त्यांना मिळत असलेल्या धमक्यांबाबत तालुका पोलीस स्टेशनला कधीही लेखी किंवा तोंडी तक्रार दिलेली नाही. असे असतांना पोलीसांची प्रतिमा मलीन करणारी व त्यांच्यावर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करणारी पोस्ट आपले सरकार पोर्टलवर टाकून पोलीसांची बदनामी केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीवर गुन्हा रजि नं. 167/2021 पोलीस अप्रितीची भावना चेतवणे अधिनियम 1922 चे कलम 3 प्रमाणे दाखल करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहेत.


दरम्यान पोलिस निरीक्षक पाडूरंग पवार यांनी आरोपीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून कुठल्याही प्रकरे अवैध धंद्यांना पाठिशी घातले जात नाही. कचेरे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पोलिसांची बदनामी केली आहे.
दरम्यान आरोपी प्रशांत कचेरे यांनी आपले सरकार पोर्टलवर हफ्तेखोरीचा व दारु विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर आरोप पोलीसांवर केला आहे. अवैध दारुविक्री संदर्भात पोलीस निरीक्षकांना पुराव्यासह गुप्त माहिती दिली असता. दुसर्‍याच दिवशी कोणतीही कारवाई न होता ज्यांच्याविषयी माहिती दिली त्यांचे गुंड आपल्याला धमक्या देतात. पो. निरीक्षक ही गुप्त माहिती आरोपींना देतात त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आपले सरकार पोर्टलवर कचेरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

मुख्‍यमंत्री महाआरोग्‍य योजनेअंतर्गत मोफत कौशल्‍य प्रशिक्षणाची संधी ; युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन

अहमदनगर - अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय...

५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी; उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत घेतली मोदींची भेट

मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत...

संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गावाच्या कोरोनामुक्तीचा पट

अहमदनगर: 'साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली. पण हे संकट ओळखून गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध...

गोरगरिबांवर लादलेली भाववाढ तातडीने कमी करावी – आ.डॉ.सुधीर तांबे ; संगमनेर काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात तालुकाभर आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले...

आजपासून लालपरी पुन्हा धावतेय रस्त्यावर ; दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर एस.टी. पुन्हा सुसाट

संगमनेर (प्रतिनिधी)मागील 64 दिवसांपासून कोरोना निर्बंधाच्या ब्रेकमुळे थांबलेली एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्हयांतर्गत व अंतर जिल्हयासाठी आजपासून धावू...