Sunday, April 11, 2021

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी, गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावाने चुकीचे व बदनामीकारक पोस्ट टाकून तसेच शिवसेना पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी येथील भाजपाचे कार्यकर्ते दिपक भगत व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे.


याबाबत माहिती अशी की, दिपक भगत व इतर जणांनी समाजमाध्यमांचा वापर करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विषयी अक्षेपार्ह मजकूर लिहून समाजात गैर समज निर्माण केला. तसेच बनावट छाया चित्रे बनवून त्याद्वारे बदनामी कारक संदेश प्रसारीत केला. या विकृत मानसिकतेमधून समाजामध्ये व दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या बदनामीकारक पोस्टमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप व तणाव निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारे जबादार मंत्र्याच्या नावाने व सरकारला बदनाम करण्यासाठी या पोस्ट सोशल माध्यमांवर फिरविल्या जात आहे. यामुळे सायबर डिफमेशन नियमांचे उल्लंघन होत असून याला जबाबदार असणार्‍या दिपक भगत व इतरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमर कतारी यांनी केली होती. या फिर्यादीवरून दिपक भगत व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...