Friday, June 11, 2021

रुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार

संगमनेर (प्रतिनिधी)
संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक तसेच समाजातील गरीब वंचित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे कोवीड रुग्ण जणू सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्यासारखे डॉक्टर, मेडीकल चालक व आता रुग्णवाहिका चालक त्यांची आर्थिक लुटमार करत आहेत. रुग्ण सी.टी. स्कॅन साठी नेणे किंवा एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हलविणे. रुग्णालयातून अंत्यविधीसाठी नेणे यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागून रुग्णांची अडवणूक केली जात आहे. जास्त पैसे मिळाले नाही तर थेट रुग्ण नाकारले जात आहेत. अशा अनेक तक्रारी येत असून रुग्णवाहिकांच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसा मृत्यूदरही वाढत आहे. एकीकडे आपले प्रियजन सोडून जात असल्याचे दुःख सहन करत असताना दुसरीकडे मरणानंतरही त्या मयताला यातना दिल्या जात असल्याचे चित्र अनेकवेळा दिसुन येत आहे. अगोदरच कोरोना आजाराने व रुग्णालयातील उपचारामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक बेजार झाले आहेत. त्यात कमी की काय म्हणून काही रुग्णवाहिका चालकही या रुग्णांच आर्थिक पिळवणूक करत आहे. माणुसकी बाजूला ठेऊन केवळ नफाखोरी चालली आहे. शहरात रुग्ण ने आण करण्यासाठी किंवा रुग्ण थेट स्मशानभुमीत पोहचविण्यासाठी सध्या जणू या रुग्णवाहिका चालकांची रेस लागली आहे. अवैध वाळूच्या गाड्या जशा सुसाट वेगाने इकडून तिकडे पळत असताना तशाच वेगाने या रुग्णवाहिका पळताना दिसत आहेत.

दरम्यान रुग्ण पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे आम्हालाही भिती आहे. असे म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांना भिती दाखविली जाते. तसेच रुग्णवाहिका सॅनिटाईझ करावी लागते असे अनेक कारणे सांगून जास्त पैसे आकारले जात आहेत. केवळ सी.टी. स्कॅनला नेण्यासाठी 1 हजार ते 1200 रुपये, मृतदेह नेण्यासाठी 5 ते 6 हजार रुपये मागितले जातात. तसेच अत्यावश्यक म्हणून पुणे-नाशिक येथे रुग्ण नेण्यासाठी मनमानी पध्दतीने रुग्णवाहिका चालक पैसे घेतात.

या रुग्णवाहिका चालकांवर सध्या कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. रुग्णालयाचे बील भरतांना अनेक रुग्णांना नाकीनऊ येत असताना किंवा रुग्ण मृत्यू पावल्यानंतर बील भरणे, रुग्णवाहिका चालकांना अतिरिक्त पैसे देणे व स्मशानभुमीतही काही जण अंत्यविधीसाठी पैसे मागत असल्याने या संपूर्ण यंत्रणेबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. संकटकाळात किमान माणूसकी दाखवून प्रत्यक्ष मदत करता नाही आली तरी चालेल परंतू कुणाचीही लुटमार, फसवणुक करु नये अशी माफक अपेक्षा नागरिक करत आहेत.

कोरोना महामारीत शासनाने आरोग्यसेवेला मोठ्या प्रमाणावर मोकळीक दिली आहे. नव्याने अनेक कोव्हीड सेंटर सुरु झाले आहेत. तसेच रुग्णसेवेसाठी मागेल त्या रुग्णवाहिकांना परवानगी दिली जात आहे. तर अनेक रुग्णवाहिका ह्या विनापरवाना रुग्णसेवा करत आहेत. शहरात किती रुग्णवाहिकांना परवानगी आहे. हा मोठा प्रश्‍न आहे. रुग्णवाहतुकीबरोबरच इतरही अवैध वस्तूंची ने आण होत असल्याचे कालच्या (दारु) घटनेवरुन आढळून आले. तर रुग्णांकडून प्रमाणापेक्षा जास्त पैसे उकळणार्‍या या रुग्णवाहिका चालकांना आळा घालणे गरजेचे बनले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

पाच नंतर बंदचा निर्णय अखेर मागे : तहसील कार्यालयात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन; मनमानी निर्णय रद्दच्या मागणीसाठी एकवटलेल्या संगमनेरकरांचा विजय

काही मोजके व्यापारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी सर्वच संगमनेरकर नागरिकांना गृहीत धरून काल जनतेमध्ये संदेश पसरवला...

संगमनेरात पुन्हा निर्बंध : पाच वाजेपर्यंतच सुरु राहणार दुकाने; कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी व प्रशासनाचा संयुक्त निर्णय

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यात कोरोना काही प्रमाणात अटोक्यात आला असला तरी पुर्णपणे संपलेला नाही. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी...

दुर्दैवी : मुंबईमध्ये रहिवासी इमारत कोसळली ; अकरा जणांचा मृत्यू अनेक जखमी

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन...

हॉस्पिटल व रूग्ण नातेवाईकांचे भांडण कुणाच्या हिताचे…? वाणी हॉस्पिटल मधील प्रकारात चूक नेमकी कोणाची ?

कोविडच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाकार उडविला. उपचारासाठी हॉस्पिटल शोधण्यापासून ते रेमडेशिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी लाखों...

कोरोना : दुसरी लाट ओसरतेय ; देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या...