Wednesday, March 3, 2021

जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 22 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी संविधान जागर ऑनलाईन व्याख्यानमाला

संगमनेर प्रतिनिधी
महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने समन्वयक स्व.संदीप खताळ यांच्या स्मृतीनिमित्त संविधान जागर या ऑनलाईन व्याख्यानमालेचे 22 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 सायंकाळी 7 ते 8 या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयहिंद चे संस्थापक अध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.


या बाबत माहिती देताना आ.डॉ. तांबे म्हणाले की, संदीप खताळ हे एक हरहुन्नरी तरुण होते. मागील महिन्यात त्यांचे अकस्मात निधन झाले. ही घटना सर्व संगमनेर करांसाठी अत्यंत दु:खदायक होती. दिवाळीच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स ही अतिशय लोकप्रिय ठरली होती. नेटके नियोजन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची स्मृती म्हणून जय हिंद लोकचळवळ च्या वतीने 22 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 या काळात रात्री 7 ते 8 या वेळेत काळात संविधान जागर या विषयावर ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.


यामध्ये शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे लोकशाही समाजवाद तर 23 जानेवारी रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत एस एम जोशी फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त प्राध्यापक सुभाष वारे यांचे स्वातंत्र्य आणि समता या विषयावर, 24 जानेवारी 2021 रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत रोजी दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांचे सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच सोमवार दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत –ाानोदय विद्यालयाच्या प्राचार्या कॉम्रेड स्मिता पानसरे यांचे समता या विषयावर तर मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत संविधान संस्कृती या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक व आमदार लहू कानडे यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी 26 जानेवारी रोजी रात्री 7 ते 8 या वेळेत आ.डॉ.सुधीर तांबे हे समारोपप्रसंगी सर्वांशी संवाद साधणार आहे. हे व्याख्यान जय हिंदच्या ऑनलाइन पेजवर प्रसारित करण्यात येत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे, जयहिंद लोक चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...