Monday, June 7, 2021

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)
स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण नाका येेथिल जिल्हा बँकेच्या समोरील बदामाचे मोठे वृक्ष अज्ञात इसमाने पहाटेची वेळ साधून तोडले. हे वृक्ष अनेक वर्षे या परिसराला गार सावली देत होते. आसपासच्या लोकांमध्ये बारीक स्वरात हे झाड परिसरातील दुकानदाराने तोडल्याचे बोलले जात आहे. विघ्नसंतोषी व्यापाराने आपल्या व्यवसायाला अडचण होते या कारणातून मागील वर्षाचा लॉक डाऊनमध्ये देखील हे वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला होता. नगरपालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमी नागरीकांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गोरगरिबांवर लादलेली भाववाढ तातडीने कमी करावी – आ.डॉ.सुधीर तांबे ; संगमनेर काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात तालुकाभर आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले...

आजपासून लालपरी पुन्हा धावतेय रस्त्यावर ; दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर एस.टी. पुन्हा सुसाट

संगमनेर (प्रतिनिधी)मागील 64 दिवसांपासून कोरोना निर्बंधाच्या ब्रेकमुळे थांबलेली एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्हयांतर्गत व अंतर जिल्हयासाठी आजपासून धावू...

पाकिस्तानमध्ये दोन एक्सप्रेस रेल्वेची भीषण धडक ; ३० ठार तर अनेक प्रवासी जखमी

पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात ३० प्रवाश्यांचा मृत्यू झालं असून,...

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा ; भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना...

कोरोना नियम पाळा – घरपट्टी टाळा ; मंगळापूरच्या सरपंच व उपसरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी प्रभावी पाऊल

संगमनेर (प्रतिनिधी)मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील 16 हजार...