Wednesday, March 3, 2021

आयपीएल (IPL) : लिलावाची तारीख ठरली; व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख

भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव होणार हे सांगण्यात आलं होते. अखेर आज IPL गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीखदेखील जाहीर केली. फेब्रुवारीच्या १८ तारखेला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा IPLने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली.

यावर्षीचा आयपीएलचा लिलाव नेमका कुठे आणि कधी होणार याबाबत बीसीसीआयने आता अधिकृत माहिती दिलेली आहे. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलच्या कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील, हे स्पष्ट होऊ शकेल.
यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावात बरेच नामांकित खेळाडू उपलब्ध होणार आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्ससारख्या संघांनी बऱ्याच नामांकित खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर लिलावात किती बोली लागते आणि ते कोणत्या संघात जातात, याचे चित्र १८ फेबुवारीला स्पष्ट होऊ शकते.


सध्याच्या घडीला आयपीएल सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय, केदार जाधव, मोनू सिंग या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये बरेच नामांकित खेळाडू पाहायला मिळतील. पण या नामांकित खेळाडूंना नेमक्या कोणत्या संघात स्थान मिळते, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. गेल्यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण यावर्षी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. यावर्षी आयपीएल एप्रिल महिन्यात होऊ शकते, असे समजते आहे. त्यामुळे त्यापूर्वी आयपीएलचा लिलाव होणार आहे.

या लिलावात कोणते संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतात, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आयपीएलच्या लिलावाकडे लागलेले आहे. त्यामुळे आता १८ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...