Sunday, April 11, 2021

सर्वांच्या दुःखात सहभागी होऊन धीर देणारे आगळे वेगळे सामाजिक कार्यकर्ते अशोकजी भुतडा यांचे निधन; संगमनेरकरांवर शोककळा

संगमनेर (प्रतिनिधी)
हजारो संगमनेरकरांच्या अंत्यविधीत पुढाकर घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार प्रत्येकाच्या रितीरिवाजाप्रमाणे व सन्मानाने पार पाडणारे सामाजिक कार्यकर्ते, अनेकांच्या दुः खात सहभागी होऊन त्यांना आधार देणारे अशोकराव भुतडा यांचे आज शनिवार पहाटे अल्पशा आजारात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे निधन संगमनेरकरांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे. विविध क्षेत्रातुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत असून संगमनेरकरांना धीर देणारा हक्काचा माणूस हरपल्याची भावना सर्व स्तरातुन व्यक्त होत आहे.


स्व. अशोकराव भुतडा यांच्या निधनाची धक्कादायक बातमी आज बाहेर पडताच शहरात एकच शोककळा पसरली. हजरोंच्या अंत्यविधीला उपस्थित राहून सरण रचणे, मडके फोडणे, अश्म जपणे, गितेचा अध्याय म्हणणे, वामनराव पै यांची हे ईश्‍वरा ही प्रार्थना म्हणणे, सावडणे आणि दशक्रिया विधी यांची उद्घोषणा करणे, सामुहिक श्रध्दांजली वाहणे ही कामे अशोकराव गेली अनेक वर्ष अमरधाममध्ये अथकपणे क रत होते. कोरोना संकटात त्यांचे निधन झाल्याने शासकीय नियमानुसार त्यांच्यावर प्रेम करणार्‍या असंख्य नागरिकांना त्यांच्याच अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नसल्याची सल अनेकांच्या मनात सलत आहे. बाजारपेठेत छोटेसे दुकानाच्या माध्यमातून उपजिविका करुन त्यांनी युवक काँग्रेस, युवक बिरादरी, सर्वोदय प रिवार, लालजी चौक आणि बाजारपेठ मित्रमंडळ, व्यापारी असोसिएशन, संगमनेर मर्चंन्ट बँक, संगमनेर नगरपालिका, रिमांड होम, बाळासाहेब थोरात मित्र मंडळ आदि संस्था व संघटना यांच्या वाटचालीत त्यांनी मोठे योगदान दिले.


निर्भीड व स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसमाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या, कुटूंबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे मोठे काम अशोक राव भुतडा हे सातत्याने करत होते. असे समाजसेवक हरपल्याने संगमनेरकरांवर मोठी शोककळा पसरली आहे. ज्या अमरधाममध्ये त्यांनी हजारो प्रेतांवर अंत्यसंस्कार केले त्या अमरधामचे आता नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. हे अमरधाम सध्या नागरिकांसाठी खुले झालेले नाही मात्र अशोकरावांचा अंत्यविधी याच नुतन अमरधाममध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या नूतन अमरधाम शेडला स्व. अशोकजी भुतडा यांचे नाव देण्यात यांत असल्याचे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी जाहीर के ले आहे. यावरुनच त्यांच्या कार्याचे महत्व विषद होते.
स्व. अशोकराव भुतडा यांच्या निधनाबद्दल महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीरजी तांबे, नगराध्यक्षा दुगाताई तांबे, इंद्रजीत थोरात, मालपाणी परिवार, सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. दै निक युवावार्ता परिवारच्या वतीने स्व. अशोकराव भुतडा यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...