
संगमनेर (प्रतिनिधी) येथील मेन रोड वरील कालभैरव मंदिरासमोर अमुल आईस्क्रीम पार्लर खास संगमनेरकरांच्या सेवेत रुजू होत असून संगमनेरकरांनी विविध प्रकारच्या या आईस्क्रीमचा स्वाद घ्यावा असे आवाहन दिवेकर व शिसोदे परिवाराने केले आहे.
खवय्यांची पंढरी असलेल्या संगमनेरकरांच्या सेवेत सुरू होणाऱ्या अमुल आईस्क्रीम पार्लर या भव्य दालनाचा शुभारंभ सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या शुभहस्ते होत आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल व परवडेल अशा विविध प्रकारचे स्वादिष्ट आईस्क्रीम योग्य दरात उपलब्ध असणार आहे. संगमनेरकरांच्या आईस्क्रीम शौकीनांनी अमुल आईस्क्रीम पार्लरला आवश्य भेट द्यावी आणि आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दिवेकर व शिसोदे परिवाराने केले आहे.
