Thursday, January 28, 2021

ह्या आजारानं मात्र दिवाळी खाल्ली – विराजस कुलकर्णीची

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ही माहिती त्यानं स्वत:च चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर त्याला लवकर बरं होण्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.
करोनावर मात केल्यानंतर विराजसनं एक अनोखी इन्स्टा पोस्ट करत, करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. सोबतच या संपूर्ण काळातला करोनाचा अनुभव कसा होता हे देखील त्यानं सांगितलं आहे.
मालिकेतल्या त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आदित्य कश्यप असं असून, त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चाहत्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, की हाय मित्रांनो, मागचे दहा दिवसांत काही गोष्टी झाल्या. एक म्हणजे मी सोशल मीडियावरून गायब झालो होतो, आणि दुसरं तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि कमेंट्सचा भडिमार होत होता. सगळ्यांना उत्तकं देणं शक्य नव्हतं. मला करोनाची लागण झाली होची. पण आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय आणि नशिबानं सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र, ह्या आजारानं खाल्ली. पण, आता पुन्हा शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. आणि आपण टीव्हीवर आणि सोशल मीडियावर भेटत राहूच’, अशा आशयाची पोस्ट विराजसनं केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...

भांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक

घारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...