Thursday, January 28, 2021

श्रीसंत करेल का टीम इंडियामध्ये कमबॅक??

फलंदाजाला स्लेजिंग व्हिडीओ व्हायरल

IPL स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनं पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला श्रीसंतवरची बंदी उठवण्याचे आदेश दिल्यानंतर आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी श्रीसंतची केरळच्या संघात निवड झाली आहे. तब्बल ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे.

विडिओ –


सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला सुरुवात होण्याआधी झालेल्या सराव सामन्यात श्रीसंत आपल्या जुन्या आक्रमक अंदाजात दिसला. सराव सामन्यात गोलंदाजी करताना श्रीसंत आक्रमक पद्धतीनं गोलंदाजी करताना आणि फलंदाजांना स्लेजिंग करताना दिसला. सराव सामन्यातील श्रीसंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये फलंदाजाला श्रीसंत स्लेजिंग करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान युवा संजू सॅमसन केरळच्या संघाचं नेतृत्व करणार असून सचिन बेबी उप-कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रीसंत, सॅमसन, बेबी यांच्याव्यतिरीक्त बसिल थम्पी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णू विनोद, सलमान निझार, निधेष एम.डी आणि आसिफ के.एम या खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे.

दरम्यान ७ वर्षाच्या बंदीनंतर भारतीय संघात त्याचे पुनरागमन होते का नाही अशी उत्सुकता त्याच्या चाहत्या,मध्ये आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...